मोहनदरी ट्रेक -एक अविस्मरणीय ट्रेक किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: सातमाळ | ||||||
| जिल्हा : नाशिक | श्रेणी : कठीण | ||||||
|
पहाटे 4 वाजता जाण्याचे ठरले. मोहनदरी ट्रेक सर्वांसाठी नवीन. दुपारी परतीचे नियोजना मुळे ट्रेक पूर्ण करून परत नाशिक गाठायचे होते. पहाटे साडे चार वाजता मित्राच्या गाडीतून आम्ही आठ जन मोहनदरी कडे निघालो. मोहनदर किल्ला हा सप्तश्रृंगी देवीला जाताना एक गोल बोगदा असणारा डोंगर! मोहनदरी गावात गेल्यावर गाडी पार्क केली आणि डोंगर चढायला सुरुवात केली. चंद्राच्या प्रकाशात गोल नेढ़ दिसत होती. साडे पाच झाले असावेत. रस्ता माहित नव्हता. पण गावतुन पाय वाट एकाने दाखवून दिली. सर्वांकडे टोर्च होत्या. वाट शोधत, चुकत शिकत डोंगराच्या मध्यावर गेलो. रस्ता तसा अवघड होता. पण काही झाले तरी सुर्योदय वरतून बघायचे होते. आम्ही एक तासत नेढे पर्येन्त गेलो. मोठ्या हिमतीने आम्ही 10 ते 15 फुट कडा चढून गोल नेढयात पोहचलो. तेथुन दिसनारा निसर्ग मनमोहक आणि अविस्मरणीय होता. खुप सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. खुप सारे फोटो काढले. सर्व जन या सुंदर सूर्योदय आणि गोल नेढे बघुन तृप्त झाले. मनमुराद फोटो काढून झाल्यावर बरोबर आनलेले डबे खायला घेतले. एवढ्या उंचीवर जेवनाची मजा काही निराळीच! हे अद्भुत सौन्दर्य डोळ्यात साठवून आता परतीचा मार्ग पकड़ायचा होता. एक मेकाला साथ देत खाली उतरलो. पुन्हा गाड़ीत गप्पा गोष्टी करत नाशिकला आलो. हा ट्रेक अनुभव खुप सुन्दर होता तसा तो अविस्मरणीय राहील कारण कोणत्याही रोप शिवाय आम्ही तो कडा (नेढ) चढून गेलो होतो. हा ट्रेक करताना प्रस्ताररोहनाचे साहित्य जवळ असुद्या. कोणताही ट्रेक करताना सुरक्षितता खुप महत्वाची! मोहनदरी किल्लायाबद्दल थोडक्यात: नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्या सातमाळ डोंगररांगेत मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडले. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो. मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहण करून १२ ते १५ फ़ुट चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी जातात. गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते. मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग: मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो. मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.
| |||||||
Thursday, 24 January 2019
मोहनदर किल्ला - मोहनदरी ट्रेक (नेढ)
Subscribe to:
Posts (Atom)

